विद्यार्थी आणि शाळा

सेवक मान्यता

कर्मचारी योजना

शाळा व्यवस्था नोंदी

कर्मचारी वेतन

पदोन्नती

रजा नियमावली

सेवानिवृत्ती

हक्क आणि कर्तव्य

विविध योजना

प्रस्तावना

या वेबपेज वर काही निवडक महत्वाचे शासन निर्णय संग्रहित केले आहेत. खाजगी माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांशी संबंधित जास्तीत जास्त परिपत्रके येथे आहेत. आपल्या प्रत्येकाकडे या शासन निर्णयांचा संग्रह असणे अनिवार्य आहेच, रोजच्या कार्यालयीन कामकाजात यांचा संदर्भ सतत येतो , अशाच महत्वाच्या निर्णयांचे संग्रहित दालन येथे आहे.

येथे असलेले सर्व शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबपेज वरून घेतलेले आहेत. शासनाच्या वेबसाईट वर किंवा इतर कोणत्याही वेबसाईटवर अशा प्रकारची मांडणी केलेली आढळणार नाही. शासनाच्या वेबसाईट वर ठराविक शासन निर्णय अक्षरे टाईप करून शोध घेता येत नाही, म्हणजे शोधायचा झालाच तर मला त्याची विभाग व निर्गमित केल्याचा दिनांक ठाऊक असला पाहिजे, नाहीतर मग एक एक विभाग निवडून वर्षानुरूप सर्वच निर्णय शोधात बसावे लागते, यासाठी पुष्कळ वेळ वाया जातो, हेच मला व माझ्या काही मित्रांना खटकले. त्यातूनच अशा प्रकारचे एक वेबपेज बनवावे, ज्यामध्ये विषयानुरूप शासन निर्णय एकत्रित सापडतील, हा विचार मनाशी ठरवून या पेजची निर्मिती केली आहे.

पेजच्या डाव्या बाजूला मेन्यू बार आहे. मुख्य विषय मथळ्या वर कर्सर नेल्यास इनर पेजेस ओपन होतील. यातील विषयांवर क्लिक केल्यास संबंधित जीआर लिस्ट पाहायला मिळतील. यातील हव्या असलेल्या जीआर वर क्लिक करा तो ओपन होईल. डाऊनलोड करावयाचा असल्यास राईट क्लिक करून सेव्ह करू शकता. पेजच्या उजव्या बाजूला स्क्रोलिंग होणारे महत्वाचे शासन निर्णय दिसतील. यामध्ये वेळोवेळी बदल केले जातील. म्हणजे येणारे नवीन निर्णय अपडेट केले जातील.

महत्वाचे शासन निर्णय

 

 

 

 

वेबसाईट चे सर्व हक्क राखीव आहेत.कणकवली क्लार्क ग्रुप
Free Web Hosting