विद्यार्थी आणि शाळा

सेवक मान्यता

कर्मचारी योजना

शाळा व्यवस्था नोंदी

कर्मचारी वेतन

पदोन्नती

रजा नियमावली

सेवानिवृत्ती

हक्क आणि कर्तव्य

विविध योजना

नैमित्तिक रजा व अर्जित रजा

अ.क्र.
शासन निर्णय विषय
संबंधित विभाग
दिनांक
०१
नैमित्तिक रजा पुरेशा कारणाशिवाय मागितली असल्यास नाकारणे - पूर्वानुमती शिवाय घेतल्यास अवैतनिक रजा मानणे, बदली रजा देय रजेच्या पूर्वी सुट्ट्यांच्या पूर्वी घेता येईल. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग २४/३/१९८२
०२
नैमित्तिक रजा (नैमित्तिक रजा एका वेळी ७ दिवसांपेक्षा अधिक घेता येणार नाही ) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग २१/१२/१९९८
०३
अर्जित व अर्धवेतनी रजा परिगणना करण्याच्या पद्धतीत सुधारणा - प्रत्येक वर्षाच्या जानेवारी व जुलै मध्ये अर्जित रजा व अर्धवेतानी रजा अनुक्रमे १५ दिवस व १० दिवस जमा होईल. (नियम ५० ) व (नियम ६० पुस्तकात अंतर्भूत आहे.) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ९/११/१९९०
०४
अर्जित रजा परिगणना करण्याच्या पद्धतीत सुधारणा - प्रत्येक वर्षाच्या जानेवारी व जुलै मध्ये अर्जित रजा व अर्धवेतानी रजा अनुक्रमे १५ व १० दिवस जमा होईल , कॅलेंडर वर्षाच्या मध्येच रुजू झाल्यास /राजीनामा /सेवानिवृत्त /सेवेतून काढून टाकणे /बडतर्फ निलंबन /मृत्यू याकरिता प्रत्येक पूर्ण महिन्याकरिता २.५ दिवस रजा (नियम ५१व६० ) म.ना.से. रजा नियम १९८१ च्या शेवटी दुरुस्ती चिट्टी आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ९/११/१९९०
०५
शासन सेवेत तदर्थ / अस्थायी नियुक्ती करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या रजा - २.५ अर्जित रजा, रजा रोखीकारणाचा लाभ नाही , सलग ३ वर्षे असल्यास नियम अस्थायी कर्मचाऱ्यांप्रमाणे रजेचा लाभ मिळेल. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग १/३/१९९७
०६
अर्जित रजेचे प्रत्यार्पण (रजा विकणे )सदर सवलत दि.१/२/२००१ पासून बंद केली आहे.(नियम ७३) याबाबतची अधिसूचना दि.५/२/२००१ शालेय शिक्षण व क्रीडा विभाग १५/१/२००१
०७
अर्जित रजा साठविण्याची मर्यादा २४० ऐवजी ३०० दिवस केली शालेय शिक्षण व क्रीडा विभाग १५/१/२००१
०८
उपरोक्त आदेशाची अधिसूचना निर्गमित - अर्जित रजेची मर्यादा २४० ऐवजी ३०० केली शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ५/२/२००१
०९
विशेष रजा मंजूर करण्यात आल्यावर वर्षाच्या सुरुवातीस अर्जित रजा जमा करण्याबाबत - नियम ३ अ ) क्षयरोग /कर्करोग /पक्षघात झालेल्या कर्मचाऱ्यास १ वर्षाच्या मर्यादेपर्यंत सलग पूर्ण वेतनी विशेष रजा मंजूर करण्यात आल्यावर पुढील अर्ध्या वर्षाच्या सुरुवातीस त्याच्या खाती जमा करावयाच्या अर्जित रजा विशेष रजेच्या कालावधीच्या १/१० परंतु कमाल १५ दिवसांपर्यंत कमी करता येईल. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ६/१२/२००५
१०
  शालेय शिक्षण व क्रीडा विभाग  

 

महत्वाचे शासन निर्णय

 

 

 

 

वेबसाईट चे सर्व हक्क राखीव आहेत.कणकवली क्लार्क ग्रुप
Free Web Hosting